घरदेश-विदेशघर मालकिनीच्या अस्थी पाहून पाळीव कुत्र्याने उंचावरून मारली उडी!

घर मालकिनीच्या अस्थी पाहून पाळीव कुत्र्याने उंचावरून मारली उडी!

Subscribe

घर मालकिनीच्या मृत्यूच्या दु: खात पाळीव कुत्र्याने घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून दिलाआपला जीव

कुत्र्याची निष्ठा आणि मालकाला कुत्राबद्दल असणारी काळजी, ओढ तसेच आसक्तीची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतीलच पण कानपूरमध्ये पाळीव कुत्र्याने असे काही कृत्य केले की, संपूर्ण भागात कुत्र्याच्या निष्ठेबद्दल चर्चा होत आहेत. तसेच, या घडलेल्या प्रकाराबद्दल लोकांचे डोळे देखील पाणावले आहेत. घर मालकिनीच्या मृत्यूच्या दु: खात पाळीव कुत्र्याने घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला असल्याचे समोर आले आहे.

आजतकने दिलेल्या वृतानुसार, ही घटना कानपूरच्या बर्रा परिसरातील आहे. या पाळीव कुत्र्याचे नाव जया असे असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा तिने तिच्या घर मालकिनीच्या मृतदेहाची अस्थी पाहिल्या तेव्हा ती चांगलीच सुन्न झाली आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.

- Advertisement -

या घटनेनंतर पाळीव कुत्र्याची आणि घर मालकिन यांच्यात असणारे प्रेम, जिव्हाळा याविषयी त्या परिसरात सध्या चर्चा सुरू आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घरात ही कुत्री मृतदेहाकडे बघून मोठ्याने भूंकत होती, त्यामुळे तिला चौथ्या मजल्यावर नेले होते. मात्र तरी ती कुत्री शांत होत नव्हती.

- Advertisement -

त्यावेळी, जेव्हा कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी मृत मालकिनीचा मृतदेह घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या कुत्रीने मृतदेहाजवळ उंचावरून उडी मारली. चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर, काही सेकंदांकरिता एकदा ती कुत्री उठली; मालकिनीकडे पाहण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने जीव सोडला. यानंतर कुटुंबियांनी तिच्या स्मृतीत या पाळीव कुत्रीची कबर त्यांच्या घरातच बनविली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, घऱ मालकिन डॉ.अनिता सिंग हे आरोग्य विभागात सहसंचालक होते. त्यांचे पती हमीरपूर हे सीएमओ आहेत. तर त्याचा मुलगा तेजस देखील डॉक्टर आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे बुधवारी त्यांचे निधन झाले. डॉ तेजस याने सांगितले की, डॉ. अनीता यांना १३ वर्षांपूर्वी ही कुत्री केपीएम रुग्णालयात आजारी असताना दिसली होती. त्यानंतर त्यांना या कुत्रीला घरी आणले आणि उपचार केले. यानंतर त्यांनी त्याचे नाव जया ठेवले होते.

पुढे तेजस यांनी सांगितले की, जयाची डॉक्टर अनिताशी इतकी आपुलकी होती की, ती घरी येईपर्यंत दारातच वाट बघत असायची. जया फक्त त्यांच्याबरोबर जेवायची. आठ दिवस त्याने आपल्या आईला पाहिले नव्हते. जेव्हा मम्मीचा मृतदेह आला, तेव्हा आम्ही तिचे मृतदेह कुत्रीने पाहू नये अशी आमची इच्छा होती. पण जेव्हा तिने वरून मृतदेह पाहिला, तेव्हा तिने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.


खुशखबर! भारतात १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार कोरोनाची पहिली लस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -