‘या’ साठी बायको लाडूशिवाय दुसरे काही खाऊच देत नाही

पतीची तब्येत चांगली राहावी म्हणून त्यांना दररोज जेवण न देता लाडू दिले जात असल्यामुळे याला कंटाळून पतीने न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

Uttar pradesh
UP Man Seeks Divorce, Says Wife Only Gives Him Laddoos To Eat
घटस्फोट

आजपर्यंत न्यायालयात घटस्फोटाचे अनेक खटले आपण ऐकले असतील. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयात एक वेगळ्याच पद्धतीने घटस्फोट घेण्यात आला आहे. ‘आपली पत्नी खाण्यासाठी फक्त लाडू देत असल्याने एका पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पत्नी मांत्रिकाच्या प्रभावाखाली असून यामुळेच ती आपल्याला वारंवार लाडू खाण्यासाठी देत असल्याचा पतीचा आरोपआहे. त्यामुळे त्यांनी कंटाळून न्यायालयात धाव घेतली आहे.

यासाठी केला घटस्फोटासाठी अर्ज

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयात पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ‘पत्नी मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार आपल्याला जेवण न देता लाडू खायला देते. दररोज सकाळी चार आणि संध्याकाळी चार , असे सतत लाडू खायला लावते. यादरम्यान आपल्याला इतर कोणतेही अन्न खाण्यास दिले जात नाही‘, असे पतीच म्हणणे आहे.

का देत लाडू खायला?

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणाऱ्या दांपत्यांचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत. पतीने दिलेल्या माहितीनुसार, आपण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होतो. त्यानंतर पत्नी एका मांत्रिकाच्या संपर्कात आली होती. या मांत्रिकाने फक्त लाडू खायला घाला असा सल्ला दिला आहे. त्यानुसार त्यांची पत्नी त्यांना सतत लाडू खायला देत आहे. त्यामुळे पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.


हेही वाचा – तरूण पिढीत वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण…


घटस्फोटाच्या अर्जासाठी दिलेले हे कारण ऐकून कुटुंब सल्ला केंद्रातील अधिकारी गोंधळात पडले आहेत. ‘आम्ही समुपदेशनासाठी दांपत्याला बोलावू शकतो. पण, फक्त अंधश्रद्धाळू आहे म्हणून महिलेवर उपचार करु शकत नाही. पतीला लाडू खाण्यास दिल्याने तब्येत सुधारेल, असा तिचा विश्वास आहे आणि इतर कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास ती तयार नाही‘, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा – नागपूरचा पती आणि युएसच्या पत्नीने घेतला व्हाट्सअॅपवरून घटस्फोट