धक्कादायक! ७ मुलांची आई आणि ७ नातवंडाची आजी पडली २२ वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात

एका ६० वर्षाच्या आजीचे एका २२ वर्षाच्या तरुणासोबत उतार वयात प्रेम झाल्याची घटना घडली आहे.

Uttar pradesh
UP Police Files FIR Against 22 year old Man For Falling in Love With 60 year old Mother of 7 Kids
७ मुलांची आई आणि ७ नातवांची आजी पडली २२ वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात

प्रेमाला कोणतीही परिसीमा किंवा व्याख्या नसते. त्याचप्रमाणे प्रेमाला वयाची मर्यादा किंवा समाजाच बंधनंही नसत, असं म्हणतात. पण याचा शब्दश: प्रत्यय एका घटनेतून समोर आला आहे. ही प्रेमकहाणी उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. एका ६० वर्षाच्या आजीचे चक्क २२ वर्षाच्या तरुणासोबत प्रेम झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी आजीच्या पतीने आणि मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, कोणाविरोधात तक्रार दाखल करावी, असा प्रश्न पोलिसांना देखील पडला होता.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यातल्या एका गावात ही घटना घडली आहे. अचानक बायको घरातून गायब झाली आणि त्याच गावातील तरुण देखील गायब झाल्याची घटना घडल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर स्त्रीच्या पतीने आणि तिच्या मुलांनी पोलीस स्टेशन गाठत पळून नेहणाऱ्या तरुणाबाबत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याचे समजताच तो युवकही आपल्या परिवारासह पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आपले या ६० वर्षाच्या महिलेवर खरेखुरे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण या महिलेसोबत लग्न देखील करणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्या स्त्रीच्या आणि मुलाच्या घरच्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

या आजीला आहेत ७ मुले

या ६० वर्षाच्या आजीला ७ मुले असून त्यातल्या काहींची लग्न देखील झाली आहेत. तर उतार वयात प्रेमात पडलेली आजी ७ नातवंडाची आजी आहे. यापूर्वी देखील या दोघांनी घर सोडल्याची माहिती पोलिसांसमोर उघड झाली आहे. मात्र, अशाप्रकारे न सांगता घरातून निघून गेल्याबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराची शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याबदंदल पोलिसांनी अखेर त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित व्यक्तींची बदनामी होऊ नये, म्हणून नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.


हेही वाचा – अजब! नवरदेव म्हणतो…मला हवी १०० किलो वजनाची नवरी