घरक्राइमUP मध्ये 'विकास दुबे' प्रकरणाची पुनरावृत्ती? पोलिसांची गाडी पलटी, फक्त गँगस्टर ठार!

UP मध्ये ‘विकास दुबे’ प्रकरणाची पुनरावृत्ती? पोलिसांची गाडी पलटी, फक्त गँगस्टर ठार!

Subscribe

महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरजवळ विकास दुबे नावाच्या एका गँगस्टरचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. त्यावेळी विकास दुबेला गाडीत घेऊन जाताना गाडी पलटी होऊन विकास दुबेने पळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो पोलिसांच्या हातून मारला गेल्याचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश (UP Police) पोलिसांनी दिलं होतं. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातच तशीच एक घटना घडली आहे. फक्त यामध्ये गँगस्टरला गोळ्या घालण्याची पाळी उत्तर प्रदेश पोलिसांवर आली नाही. पण रस्त्यात गाडी पलटी झाली आणि अपघातात गँगस्टरचा मृत्यू झाला, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात विकास दुबे प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाली का? असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रतरणात गुना पोलीस तपास करत आहेत.

या गँगस्टरचं नाव आहे फिरोज!

५८ वर्षीय फिरोजवर उत्तर प्रदेशच्या ठाकुरगंज पोलीस स्थानकात २०१४मध्ये गँगस्टर अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून फिरोज फरार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तहेरांकरवी पोलिसांना फिरोज मुंबईत असल्याची खबर मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक एका खासगी इनोव्हा कारने मुंबईत दाखल झालं. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातल्या एका झोपडपट्टीत फिरोज राहात होता. तिथून त्याला अटक करून शनिवारी रात्रीच पोलिसांच्या पथकानं लखनौच्या दिशेनं प्रवास सुरू केला.

- Advertisement -

उत्तर प्रदेशपर्यंतचा त्यांचा प्रवास…

अगदी व्यवस्थित झाला. मात्र, रविवारी सकाळी मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्याच्या चांचोड पोलीस ठाणे हद्दीत हे सर्वजण असलेली इनोव्हा कार पलटी झाली. या अपघातात गँगस्टर फिरोजचा मृत्यू झाला. तर इतर पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर समोरून अचानक एक गाय आली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली.

कुठे आली शंका?

वास्तविक आरोपीला पकडण्यासाठी जाताना पोलिसांनी सरकारी वाहन वापरावं असा नियम असताना उत्तर प्रदेश पोलीस फिरोजला पकडण्यासाठी एक खासगी गाडी घेऊन आले होते. शिवाय रात्रीच्या वेळी त्यांनी एका गँगस्टरला लांबच्या प्रवासात खासगी गाडीने नेण्याची जोखीम घेतली. विशेष म्हणजे मध्य प्रदेशपर्यंतचा प्रवास व्यवस्थित होऊन मध्य प्रदेशच्या हद्दीत कार शिरल्यानंतर हा अपघात झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अपघातात फक्त गँगस्टर मारला गेला. इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र किरकोळ जखमी झाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशयाचं वातावरण तयार झालं आहे.


हेही वाचा – पडक्या घरावर दिसतं विकास दुबेचं भूत, येतो हसण्याचा आवाज; ग्रामस्थांचा दावा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -