घरदेश-विदेशऔरैया अपघात: योगी सरकारने जखमी कामगारांना मृतदेहांसह ट्रकमधून पाठवलं

औरैया अपघात: योगी सरकारने जखमी कामगारांना मृतदेहांसह ट्रकमधून पाठवलं

Subscribe

उत्तर प्रदेशमधील औरैया येथील अपघात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह चक्क ट्रकमधून झारखंडला पाठवलं. यासह जखमी मजुरांना देखील त्याच ट्रक मधून पाठवण्यात आलं. यावर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार अमानवीय असल्याचं म्हटलं आहे.

लॉकडाऊन दरम्यान स्थलांतर करणारे कामगार राज्य सरकारांना आता नकोसे झाले आहेत. ना त्यांना जिवंत असताना किंमत दिली जातेय ना मरणानंतर. दोन दिवसांपूर्वी शनिवारी औरैया येथील रस्ता अपघातातील कामगारांसमवेत अमानुषतेची मर्यादा ओलांडली आहे. ताडपत्रीमध्ये मृतदेह गुंडाळून ट्रकच्या कोपर्‍यात ठेवले आणि त्यांच्या शेजारी जखमी कामगार बसवण्यात आल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने चक्क मृतदेह ट्रकमध्ये भरून झारखंडला पाठवले. एवढंच नाही तर जखमी मजुरांना मृतदेहांसमवेत बसवून त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं. यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. “यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असं दिनेश शर्मा म्हणाले. या घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत हा प्रकार अमानवीय आणि अत्यंत असंवेदनशील आहे. जखमींवर झारखंडच्या हद्दीत प्रवेश करताच योग्य उपचार करण्यात यावेत. तसंच, संपूर्ण सन्मानाने मृतदेहां त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करावी.

- Advertisement -


हेही वाचा – Cyclone Amphan: अम्फान चक्रिवादळाने पकडला वेग; बंगाल-ओडिशामध्ये पाऊस

- Advertisement -

प्रयागराज येथे पाच तास ट्रक उभे

हेमंत सोरेन यांच्या ट्विटनंतर प्रयागराजमधील दिल्ली-हावडा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक थांबवण्यात आले. या दरम्यान ट्रक सुमारे पाच तास उभे राहिला. ट्रक चालक म्हणाला की, मृतदेहांमधून दुर्गंधी येऊ लागल्याने ट्रक चालवणं कठीण होत होतं. असं सांगितलं जात आहे की १७ मृतदेह तीन ट्रकमध्ये भरले गेले आणि त्यांना झारखंडमधील बोकारो आणि पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले.

शुक्रवारी रात्री औरैया येथे अपघात झाला

१६ मे रोजी दुपारी अडीच वाजता राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक धडकले. या अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर नंतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर ४० जखमी झाले. या घटनेनंतर औरैयाच्या आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -