CoronaVirus: ‘अत्यावश्यक वस्तुंची दुकानं दररोज सुरू राहणार’

New Delhi
prakash javadekar
प्रकाश जावडेकर

जगभरात करोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांना करोनामुळे लॉकडाऊन करायला भाग पडला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केली. २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त गर्दी करू नका. जरी लॉकडाऊन झालं असलं तरी अत्यावश्यक वस्तूंची दुकानं ही दररोज सुरू राहणार आहेत, असं म्हणाले.

लॉकडाऊन आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी

तसंच त्यांनी गुजरातील मधील एका दुकांनाबाहेर मार्किंग केलेल्या ठिकाणी राहून, सुरक्षित अंतर ठेवून वस्तू खरेदी करतानाचा फोटो दाखवला. तसंच ते पुढे म्हणाले की, या दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. २१ दिवसांचा लॉकडाऊन आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचे पालन करावे. मोदींनी आपल्या हितासाठी निर्णय घेतला आहे.

सर्दी, खोकला असेल तर लगेच दवाखान्यात जा. सुरक्षित अंतर ठेवा, असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं. तसंच सॅनिटायझरची गरज नाही साबणाने हात धुतले तरी चालतील, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. आतापर्यंत देशात ५६३ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus : करोनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात वाढला दुरावा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here