घरताज्या घडामोडीएका कुटुंबाला कचऱ्यात सापडले कोट्यवधी रुपये

एका कुटुंबाला कचऱ्यात सापडले कोट्यवधी रुपये

Subscribe

एका कुटुंबाला चक्क कचऱ्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत.

सध्या जगात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. तसेच लोकांना आपले रोजगार जाणार का याचीही चिंता आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये देखील लोकांमध्ये प्रामाणिकपणा टिकून राहिल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतल्या एका कुटुंबाला कचराकुंडीत चक्क कोट्यवधी रुपये सापडले आहेत. मात्र, या कुटुंबियाने प्रामाणिकपणे पैसे पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

नेमके काय घडले?

अमेरिकेमधील व्हर्जिनियाचे डेव्हिड आणि एमिली शान्त्ज्ञ आपल्या मुलांसह कॅरोलिन काउंटीतील त्यांच्या घराकडे पिकअप ट्रकने जात होते. त्याच दरम्यान, त्यांना वाटेत रस्त्याच्या कडेला कचराकुंडीत दोन बॅगा दिसल्या डेव्हिडने गाडी थांबवली आणि बॅगा उचलल्या. त्यावर सरकारी शिक्के मारले होते. जे अमेरिकेच्या टपाल खात्याचे होते. डेव्हिडने ती बॅग उचलली आणि गाडीत ठेवली. मग, त्याने गाडी चालू करुन घर गाठले. जेव्हा डेव्हिड आपल्या घरी पोहोचले आणि त्यांनी ती बॅग उघडली. ती बॅग उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण त्या बॅगमध्ये १० लाख डॉलर्स म्हणजेच ७.५० कोटी रुपये प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यावर रोख तिजोरी, असे लिहिले होते. त्यानंतर त्यांनी त्याविषयी कॅरोलिन काउंटी पोलिसांना कळविले. मिळालेल्या माहितीनुसार, थोड्याच वेळ्यात पोलिसांची टीम त्यांच्या घरी पोहोचली.

- Advertisement -

हे पैसे रस्त्यावर कसे पडले याबाबत आम्ही शोध घेत आहोत. तसेच या दाम्पत्यांचा प्रामाणिकपणा यातून दिसून आला आहे, अशी माहिती कॅरोलिन शेरिफ मेजर स्कॉट मॉसर यांनी दिली आहे.


हेही वाचा – ५ देशांच्या गुप्तचर संस्थांनी वुहानचं रहस्य उलगडलं; चीनने कोरोना तयार केल्याचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -