घरदेश-विदेशलॉकडाऊनमुळे केरळमध्ये अडकलेला अमेरिकन नागरिक म्हणतो...

लॉकडाऊनमुळे केरळमध्ये अडकलेला अमेरिकन नागरिक म्हणतो…

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अमेरिकन नागरिक केरळमध्ये अडकला आहे. कोरोना काळात सरकारची नागरिकांप्रति असलेली भावनेने तो इतका भारावून गेला आहे की आता त्याला परत अमेरिकेत जायचं नाही आहे. केरळमधील कोची येथे गेले पाच महिने अमेरिकन नागरिक जॉनी पियर्स (७४) अडकून आहेत. कोरोनामुळे अमेरिकेत अराजकता माजली आहे. अमेरिकन सरकार भारतीय सरकारप्रमाणे काळजी घेत नाही आहे. त्यामुळे त्यांना इथेच राहायचं आहे, असं जॉनी पियर्स म्हणाले. शिवाय त्यांनी टूरिस्ट व्हिसाला बिझिनेस व्हिसामध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पियर्स पुढे म्हणाले, “मी केरळमध्ये १८० दिवस राहण्यासाठी आणि येथे एक ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्यासाठी व्यवसाय व्हिसा मिळावा म्हणून मी याचिका दाखल करत आहे. माझे कुटुंबसुद्धा इथे यावे अशी माझी इच्छा आहे. इथं घडत असलेल्या गोष्टींमुळे मी खूप प्रभावित झालो आहे.”

- Advertisement -

केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६९५० रुग्ण

केरळमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची ६९५० प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ३१०३ सक्रिय प्रकरणे आहेत आणि ३८२० लोक बरे झाले आहेत. तर २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये जानेवारीच्या उत्तरार्धातच सापडला होता. परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केरळ सरकारने अत्यंत प्रभावी कारवाई केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -