घरअर्थजगतअमेरिकन कंपनीचा पुढाकार; Jio मध्ये केली ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक!

अमेरिकन कंपनीचा पुढाकार; Jio मध्ये केली ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक!

Subscribe

KKR कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक करून २.२३ टक्के भागीदारी मिळवली

यापुर्वी फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये भागीदारी केली होती. यानंतर आता आणखी एका कंपनीने पुढाकार घेऊन जिओमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये अमेरिकेच्या KKR नावाच्या कंपनीने ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशातील मोठी डिजिटल सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपनीने यासंदर्भात शुक्रवारी घोषणा केली आहे.

- Advertisement -

KKR कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक करून २.२३ टक्के भागीदारी मिळवली असून या कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचेही सांगण्यात आले आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य ५.१६ लाख कोटी रुपये आहे.

इक्विटी कंपनी सिल्व्हर लेकची ही भागीदारी

याआधी २७ एप्रिल रोजी फेसबुकने रिलायन्स जिओ इंडस्ट्रीजमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर अमेरिकेतील मोठी प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारानुसार सिल्व्हर लेकने ७५ कोटी डॉलर म्हणजेच ५ हजार ६५५.७५ कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून १.१५ टक्के भागीदारी घेतली आहे. या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजसह भारताला मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Corona Live Update: मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर आज RBI गव्हर्नर यांची पत्रकार परिषद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -