घरताज्या घडामोडीअखेर जो बायडेन यांचा विजय, अमेरिकन संसदेने केले शिक्कामोर्तब

अखेर जो बायडेन यांचा विजय, अमेरिकन संसदेने केले शिक्कामोर्तब

Subscribe

अमेरिकन कॉंग्रेसमध्ये इलेक्ट्रोरल कॉलेजला घेऊन बैठकीच्या आधीच आज राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जोरदार धुडघूस घातला. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेत नुकसान केल्याचे देखील समोर आले. एवढ्या धुडघूसानंतर अमेरिकन काँग्रेसने निवडलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. संसदेत सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया अमेरिकेच्या कॅपिटल हिल इमारतीतील धुडघूस आणि हिंसाचारामुळे विस्कळीत झाली होती. याला जो बायडेन देशद्रोह म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल न स्विकारणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपट हिल येथे हंगामा केला आणि हिंसक घटनांना सामोर जावे लागले. त्यामुळे सध्या अमेरिकेत ट्रम्प यांचा निषेध केला जात असून त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून त्वरित काढून टाकण्याची जोरदार मागणी होत होती. पण आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

या हिंसक घटनेनंतर बुधवारी रात्री संसदेच्या सभागृहात बायडेन यांच्या इलेक्टोरल कॉलेजच्या विजयावर पुन्हा काम सुरू केले आणि गुरुवारपर्यंत यावर चर्चा झाली. सिनेट आणि प्रतिनिधींच्या सभा निवडणुकीच्या निकालांवरील दोन आक्षेप फेटाळले आणि अंतिम इलेक्टोरल कॉलेज वोटला मंजूरी दिली, ज्यामध्ये जो बायडेन यांना ३०६ आणि डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मते मिळाली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिका हिंसाचार: ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांचं अकाऊंट केलं ब्लॉक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -