घरदेश-विदेशकुत्र्याला कोरोनाची लागण; संसर्ग वाढू नये म्हणून केलं ठार!

कुत्र्याला कोरोनाची लागण; संसर्ग वाढू नये म्हणून केलं ठार!

Subscribe

जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झालेला हा अमेरिकेतील दुसरा कुत्रा आहे

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की, जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झालेला हा अमेरिकेतील दुसरा कुत्रा आहे. जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, ६ वर्षीय कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्वी त्याच्या मालकास संसर्ग झाल्याचे आढळले आणि नंतर त्या कुत्र्याला न्यूरोलॉजिकल रोग असल्याचे निदान झाले.

प्रसिद्धी पत्रकानुसार, कुत्र्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे देखील स्पष्ट झाले. कुत्र्याला झालेल्या आजाराचा संसर्ग वाढू नये, म्हणून त्याला ठार मारण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुत्र्याच्या न्यूरोलॉजिकल आजाराचा कोविड -१९ चा कोणताही संबंध नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे पाळीव प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी असतो.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या विषाणूमुळे तेथील मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाला आहे. अमेरिकेत एकूण २८.९ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी १.३२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर १५ हजार ९२८ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या रोगातून १२ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. दरम्यान, पाळीव प्राण्यांच्या संसर्गाच्या घटनांनी लोकांच्या चिंता नक्कीच वाढवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.


घर मालकिनीच्या अस्थी पाहून पाळीव कुत्र्याने उंचावरून मारली उडी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -