घरदेश-विदेशUS Election 2020: अमेरिकेत तणावपूर्ण वातावरण; ट्रम्प-बायडेन समर्थक आमने-सामने

US Election 2020: अमेरिकेत तणावपूर्ण वातावरण; ट्रम्प-बायडेन समर्थक आमने-सामने

Subscribe

बायडन आणि ट्रम्प समर्थक आमने-सामने आल्याने या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापट

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि काही ठिकाणी थांबवण्यात आलेली मजमोजणी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण करणारी असून अमेरिकेतील वातावरण काही ठिकाणी तणावपूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. ट्रम्प हे मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर लगेचच वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसच्याबाहेर ब्लॅक लाइव्ह मॅटर प्लाझाजवळ या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अमेरिकेतील मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू असताना ट्रम्प हे मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर लगेचच वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसच्याबाहेर ब्लॅक लाइव्ह मॅटर प्लाझाजवळ या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांचा पराभव होत असल्याने आनंद व्यक्त करण्याबरोबरच येथे मोठ्याने घोषणाबाजीही करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट हाऊसच्या बाहेर काही ठिकाणी ट्रम्प समर्थकांनी गर्दी केल्याने या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

बायडन आणि ट्रम्प समर्थक आमने-सामने आल्याने या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापट झाली. तर वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी ट्रम्प-बायडेन समर्थक भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. असोसिएट फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अनेक शहरांमध्ये प्रत्येक मत मोजले जावे म्हणजेच Count Every Vote अशा आशयाचे बॅनर्स लोकांच्या हातात दिसले आणि ते बॅनर्स घेऊन लोकं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे दोन्ही गटात तीव्र संघर्षाची चिन्ह दिसत असल्याने अमेरिकेतील यंत्रणा देखील हाय अर्लटवर आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी शांततापूर्ण तर काही ठिकाणच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरुन घोषणा देत आहेत. “Whose streets? Our streets!” आणि “If we don’t get no justice, they don’t get no peace!” अशा घोषणा आंदोलकांनी दिल्यात. तर न्यूयॉर्कमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी शहरामध्ये जागोजागी ट्रम्प समर्थकही रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. “ट्रम्प नेहमी खोटं बोलतात,” असे पोस्टर्स आंदोलकांच्या हाती आहेत. आंदोलकानी काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.


बिहार: भागलपूर येथे १०० प्रवासी असलेली बोट उलटली, ५ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -