घरदेश-विदेशअमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू देवतांचा अवमान

अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू देवतांचा अवमान

Subscribe

हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमेरिकेच्या वेफायर या ई कॉमर्स कंपनीने महादेव आणि गणपतीची प्रतिमा असणारी पायपुसणी विक्रिला ठेवली आहे.

अमेरिकेच्या बोस्टन येथील ‘वेफायर’ या ई कॉमर्स कंपनीने शंकराचे चित्र असलेली पायपुसणी विक्रीला ठेवली आहे. त्यामुळे या कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा मागणी भारतीयांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदू देवतांचा अवमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ‘अमेझॉन’ या ई कॉमर्स कंपनीने देखील हिंदू देवतांचे चित्र असलेली पायपुसणी विक्रिला ठेवली होती. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. लोकांनी या दोन्ही वेबसाईटवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

२५०० ते ३००० रुपयांत देवतांची प्रतिमा असणारी पायपुसणी

वेफायर ही ई कॉमर्स कंपनी घरगुती वस्तूका विकते. याअगोदरही वेफायर कंपनीने हिंदू देवतांचा अवमान केला होता. मात्र लोकांनी वेफायर विरोधात उचलेल्या आंदोलनानंतर वेफायरने माफी मागितली होती. आता मात्र पुन्हा वेफायरने तसे कृत्य केले आहे. शंकराची प्रतिमा असणारी पायपुसणी वेफायर २६७३ रुपयांना विकत आहे. तर गणपती बाप्पाची प्रतिमा असणारी पायपुसणी २९५३ रुपयांना विकली जात आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर बंदची हाक

गेल्या आठवड्यात अमेझॉनने देखील अशाप्रकारच्या पायपुसणी विक्रिला ठेवल्या होत्या. त्यामुळे ट्विटरवर काही युजर्सनी अमेझॉन बंदची हाक दिली होती. त्यामुळे ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंडिगला होता.

- Advertisement -

अमेझॉन एवढ्यावरच थांबले नाही. तर अमेझॉनने हिंदू देवतांचे फोटो असलेले टॉयलेट पेपरही विक्रिला ठेवले होते. ट्विटरवर काही युजर्सनी त्याचे स्क्रिनशॉट टाकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -