घरताज्या घडामोडीभारत अमेरिकेत तब्बल तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

भारत अमेरिकेत तब्बल तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

Subscribe

आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यावेळी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. यामध्ये या दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करारवरती सहमती मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमेरिकेकडून अपाचे आणि एमएच ६० रोमियो ही दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारत खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. या संरक्षण करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करा असा ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. तसंच दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र लढणार असल्याचं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान तीन सामंज्यस्य करार करण्यात आले. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य आणि संशोधन, वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता आणि दोन्ही देशांमधल्या बड्या तेल कंपन्यांमध्ये सहकार्य असे तीन करार करण्यात आले. दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहार यांसारख्या अनेक मुद्दयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसंच दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

- Advertisement -

भारतियांनी केलेले स्वागत आमच्या कायम स्मरणात राहिल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसंच या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना दिल्लीतील शालेय विद्यार्थ्यांनी मधुबनी पेंटिंग्स भेट म्हणून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -