घरदेश-विदेशअहमदाबादेत ट्रम्पना आठवला शाहरुखचा सिनेमा!

अहमदाबादेत ट्रम्पना आठवला शाहरुखचा सिनेमा!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात बॉलिवूडच्या प्रेमाबद्दल उल्लेख केला. भांगडा हा नृत्यप्रकार जगभरात प्रसिद्ध असल्याचं म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज सोमवारी त्यांची पत्नी मलेनिया ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हान्का ट्रम्प सकाळी भारत दौऱ्यासाठी थेट गुजरातमध्ये दाखल झाले. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे त्यांनी चरख्यावर सूतकताई केली. त्यानंतर ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा मैदानावरील कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह डीडीएलजे आणि शोले या चित्रपटांचा उल्लेख केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात असलेल्या बॉलिवूड आणि क्रिकेटबद्दलच्या प्रेमाबाबत सांगितले. ‘देशातील बॉलिवूडने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. संपूर्ण जगभरात बॉलिवूडचे चित्रपट मनापासून पसंत केले जातात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, शोले या सारखे चित्रपट जगभरात चांगलेच गाजले. भांगडा हा नृत्यप्रकार देखील जगभरात लोकप्रिय’ असल्याचे देखील ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात काही वर्षांत गरिबीतून भारत मुक्त होईल आणि तुम्ही प्रचंड प्रगती करुन पुढे जाल”, असा विश्वास व्यक्त केला आहे. “अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे. आम्ही तुमचा आदर करतो. म्हणून फर्स्ट लेडी मलेनिया आणि मी आठ हजार मैलांवरुन प्रवास करुन आलो आहोत”, असं म्हणत ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळत मोदी चॅम्पियन आहेत, असं म्हटलं.


हेही वाचा – ‘नमस्ते’, डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीयांच्या ‘या’ गोष्टींचं कौतुक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -