घरदेश-विदेशभारतावर पुन्हा हल्ला कराल तर भारी पडेल; अमेरिकेचा इशारा

भारतावर पुन्हा हल्ला कराल तर भारी पडेल; अमेरिकेचा इशारा

Subscribe

अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवाद्यांवर कारवाई करा, जर भारतावर पुन्हा हल्ला झाला तर त्याची किमंत मोजावी लागेल, असे व्हाईट हाऊसच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने दहशतवादी आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या लोकांवर भक्कम, पडताळणीयोग्य आणि मागे न घेता येणारी कारवाई करावी, जर भारतावर पुन्हा हल्ला झाला तर पाकिस्तानसाठी मोठी अडचण ठरेल, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानने दहशतवादी गटाविरोधात ठामपमे भूमिका घ्यावी. विशेषतः जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयब्बा यांच्यावर कारवाई करावी. भारतीय सीमेवर पुन्हा एकदा तणाव नको, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

‘जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधता प्रामाणिक करावाई केली नाही आणि त्यादरम्यान जर भारतावर पु्न्हा हल्ला झाला तर पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा ठरेल. याची किमंत पाकिस्तानला तर मोजावी लागेलच पण त्याशिवाय दोन्ही देशांना देखील त्याचा फटका बसेल, अशा स्पष्ट शब्दात अमेरिकेने आपले म्हणणे मांडले आहे. तसेच बालाकोट हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे आता अमेरिकेसहीत जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांवर तोंडदेखली कारवाई केली होती. दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यात आली होती, काही दहशतवाद्यांना अटक केली होती. तसेच जैशला दिलेल्या सुविधांवर प्रशासकीय नियंत्रण आणले असल्याची माहिती देखील व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. तसेच यावेळी पाकिस्तानकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. कारण आपण भुतकाळात पाहीले आहे की, असा हल्ला झाल्यानंतर काही दहशतवाद्यांना अटक केली जाते आणि नंतर सोडून देण्यात येते. तसेच काही दहशतवादी नेते तर देशविदेशात जाऊन फिरूनही येतात, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -