घरट्रेंडिंगTiktok Ban म्हणून काय झालं? 'ही' भारतीय App आहेत टिकटॉकपेक्षा भारी!

Tiktok Ban म्हणून काय झालं? ‘ही’ भारतीय App आहेत टिकटॉकपेक्षा भारी!

Subscribe

टिकटॉकप्रमाणेच अनेक भारतीय अ‍ॅप आहेत ज्यावर तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करू शकता. जाणून घ्या अ‍ॅपविषयी

टिकटॉक हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. अनेकांचे लाखो फॉलोअर्स टिकटॉकवर आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून अनेकजण आपल्या कलागुणांना वाव देतात. त्यामुळेच हे अ‍ॅप भारतीयांमध्ये अतीशय लोकप्रिय आहे. आज टिकटॉकमुळे अनेक स्टार झाले आहेत. लाखो रूपये कमवत आहेत. पण आता टिकटॉक बॅन झाल्यामुळे कलाकारांनो तुम्हाला नाराज होण्याची गरज नाही कारण टिकटॉकप्रमाणेच अनेक भारतीय अ‍ॅप आहेत ज्यावर तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करू शकता. जाणून घ्या अ‍ॅपविषयी

चिंगारी

चिंगारी अ‍ॅप देखील टिकटॉकसारखंच असलेलं एक अ‍ॅप आहे. तुम्ही व्हिडीओ अपलोड करू शकता, डाऊनलोडही करू शकता. मित्रांसह चॅट करू शकता. हे अ‍ॅप्लिकेशन इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलगु भाषेत उलब्ध आहे.

- Advertisement -

रोपोसो

हे व्हिडीओ शेअरिंग खासकरून हे अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. रोपोसो हे एक टीव्हीसारखं अ‍ॅप आहे. ज्यामध्ये काही व्हिडीओ विशेष चॅनेल्सवर प्रसारित केले जातात.  यामध्ये तुम्ही वॉईस ओव्हर, म्युझिक, व्हिडीओ, फोटो असं सर्व एकत्रित एडिट करून टाकू शकता.

बोलो इंडिया

या अ‍ॅपवर तुम्ही तुमचे व्हिडीओ बनवून शेअर करू शकता. हिंदी, तामिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी, ओडिया अशा भारतीय भाषांमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे व्हिडीओ शेअर करू शकता. तसेच तुम्ही कमाईही करू शकता.

- Advertisement -

यो प्लेमध्ये

यो प्ले या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एका क्लिकवर तुमच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ डाऊनलोड करू शकता फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तुमचे व्हिडीओ शेअरही करू शकता. यामध्ये फ्री म्युझिक क्लिप आणि साऊंड्स आहेत. तुम्ही तुमचे व्हिडीओ सहजरित्या एडिट करून टाकू शकता.


हे ही वाचा – ‘चीनी अ‍ॅप्स बॅन करणं हे कोरोना घालवण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखं आहे’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -