घरदेश-विदेशसर्पदंश झाल्यानंतर आईने मुलीला दूध पाजले आणि... बाळ आणि आई दोघींचाही दुर्दैवी...

सर्पदंश झाल्यानंतर आईने मुलीला दूध पाजले आणि… बाळ आणि आई दोघींचाही दुर्दैवी मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशात एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला स्तनपान केल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सापाच्या विषामुळे हा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नेमकं काय घडलं
महिला रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपली असताना सापाने तिला दंश केला होता. मात्र त्यावेळी हे समजले नाही. दुसऱ्या दिवशी अजाणतेपणे महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला स्वःतचे दूध पाजले. आईच्या शरीरातील विष चिमुकलीच्याही शरीरात पसरले. विषबाधा झालेल्या मायलेकींची प्रकृती ढासळल्यानंतर दोघींना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वी दोन्ही मायलेकींचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -
सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण जास्त

सर्पदंशाने वर्षाला एक लाखांहून अधिक मृत्यू
भारतात साधारणतः ३०० हून जास्त सापांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी ६० विषारी सापांच्या प्रजाती आहेत. यामध्ये कोब्रा, क्रेट, रस्सल्ल व्हायपर आणि सॉ – स्कॅल्ड व्हायपर हे सापांचे प्रकार आहेत. दरवर्षी जगात एक लाखांहून अधिक मृत्यू सर्पदंशाने होतात. २०११ साली अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हाइजीन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसान भारतामध्ये ४६ हजार जणांचे मृत्यू हे सर्पदंशाने झाले आहेत.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -