घरदेश-विदेशतरुणीची निर्घृण हत्या! पिशवीत डोके आणि पाय, तर बॅगेत धड

तरुणीची निर्घृण हत्या! पिशवीत डोके आणि पाय, तर बॅगेत धड

Subscribe

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अज्ञात तरूणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा मृतदेह तुकड्या – तुकड्या आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे वय साधारण २० वर्ष असून तिचा मृतदेहाचे तुकडे सुटकेस आणि प्लास्टिकच्या पिशवी सापडले आहेत. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना समोर आली असून साहेबाबाद परिसरातील एका फॅक्टरीजवळ हा मृतदेह आढळून आला आहे. तेथील नागरिकांना ती सुटकेस दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

काय आहे घटना

साहेबाबाद परिसरात संशयास्पद पडलेली सुटकेस पाहून तेथील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी ती बॅग उघडली. त्यामध्ये त्यांना महिलेल्या शरीराचे तुकडे आढळून आले. तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तिचे कापलेले डोके आणि पाय दिसून आले. यासंबंधी पोलीस अधिकारी सुशील कुमार सिंह यांनी ही माहिती दिली. या बॅगेच्या आसपास प्लास्टिच्या पिशव्या पडल्या होत्या. यातील एका पिशवीत डोके तर दुसऱ्या पिशवीत पाय ठेवले होते. प्राथमिक माहितीत ही बॅग गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पडून होती. बॅगेतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहे.

हेही वाचा –

Live: ‘राजगृहा’चा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -