घरदेश-विदेशसात वर्षीय मुलाची निघृण हत्या

सात वर्षीय मुलाची निघृण हत्या

Subscribe

मुजफ्फरनगर येथील घटना - हाथ, पाय आणि जिभ कापून फेकण्यात आला मृतदेह.

लहान मुलाचे अपहरण करुन त्याची निघृण हत्या केल्याची घटना मुजफ्फरनगर येथे घडली आहे. हत्याकरुन मुलाचे अवयव कापण्यात आलेले आहेत. त्याचा मृतदेह रस्त्यावर तसाच ठेवण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश येथील मुजफ्फरनगर येथील ही घटना असून पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेऊन शोध सुरु केला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत सात वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याच्या शरीरिराचे भाग विकण्यात आले असल्याचा संक्षय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्या अनूषंगाने तपास सुरु केला आहे.

आज सकाळी यामुलाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला. मृतदेह पाहून येथील परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर या मुलाच्या अवयव कापण्यात आल्याची माहिती समोर आली.उत्तर प्रदेशात लहान मुले आणि महिलांसोबत होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा सोबत करार केला होता. या करारामुळे गुन्हेगारीचे विश्लेषण आणि पूर्वानुमान करण्यास मदत मिळणार आहे. तरीही गुन्हांमध्ये कमतरता झालेली दिसून येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -