घरट्रेंडिंगउत्तराखंडमध्ये भीषण अपघात; ४७ ठार, ११ गंभीर जखमी

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; ४७ ठार, ११ गंभीर जखमी

Subscribe

उत्तराखंडमधल्या पौढी गडवालमध्ये आज एक बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारण ६० प्रवासी प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये असल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला, असे या अपघाताचे कारण सांगितले जात आहे.

उत्तराखंडमधल्या धुमाकोटमधील पौढी गडवालमध्ये आज एक बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारण ६० प्रवासी प्रवास करत होते. आतापर्यंत ४७ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले असून या अपघातात ११ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना देहरादूनच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे अपघात?

भौनवरुन रामनगरलाही बस जात होती. ८ वाजून ४५ च्या सुमारास चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि ही बस नानीधांडा दरीत कोसळली. २८ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -
uttrakhand map
उत्तराखंडच्या पीपली भोन मार्गावर हा अपघात झाला आहे.

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य

मदतकार्यासाठी एसआरएफची टीम घटनास्थळी असून ही बस दरीत पडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.म्हणूनच हेलिकॉप्टरची मदत घेऊन या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. अपघातातील जखमींना देहरादूनला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातात मृत प्रवासी हे स्थानिक असल्याची माहिती पोलीस महानिरिक्षक संजय गुंजाल यांनी दिली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नानीधांडा परीसरातील पीपली भोन मार्गावर हा अपघात झाला आहे. ही दरी ६० फूट खोल आहे. इतक्या वरुन बस कोसळल्यामुळे या अपघातात मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २० जणांचे मृतदेह हाती लागले असून १२ जण जखमी असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

- Advertisement -

२ लाखांची मदत जाहीर

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी  ट्विट करत घटनेचा शोक व्यक्त केला आहे. याशिवाय बचावकार्यासाठी पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून गरज भासल्यास  हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात येईल असे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपायंची मदत जाहीर केली आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -