घरट्रेंडिंगउत्तराखंड पोलिसांनी भटक्या कुत्र्यांना दिली वेगळी ओळख; व्हिडिओ होतोय व्हायरल

उत्तराखंड पोलिसांनी भटक्या कुत्र्यांना दिली वेगळी ओळख; व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

उत्तराखंडच्या पोलीसांनी भटक्या कुत्र्यांना आपल्या श्वान पथकात सामील करण्यासाठी प्रशिक्षण दिले...

आजकल पेपरमध्ये भटक्या कुत्र्यांशी संबंधीत अनेक बातम्या वाचायला मिळतात. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, लोकांना त्यांचा होणारा त्रास याबद्दल आपण एकदा तरी वाचलंच असेल. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून प्राणी मित्रांना या सगळ्याच कुत्र्यांना घर मिळवून देणं शक्य नाही आणि जी लोक घरी कुत्रे पाळतात ते परदेशी वाणांना प्राधान्य देतात. त्यामुळं भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चाललेला आहे. मात्र उत्तराखंडच्या पोलीसांनी भटक्या कुत्र्यांना आश्रय देण्यासाठी एक वेगळंच पाऊल उचललं आहे. उत्तराखंड पोलीसांच्या ऑफिशियल ट्विटर अकांउटवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला गेला. या व्हिडिओमध्ये पोलीस पथकातील स्निफर डॉग्जची ट्रेनिंग चालू असलेली दिसत आहे.

‘उत्तराखंडाच्या पोलीसांची शान आहेत हे स्निफर डॉग्ज.भारतात पहिल्यांदाच उत्तराखंडाच्या पोलीसांनी भटक्या कुत्र्यांना ट्रेंनिग देऊन त्यांना श्वान पथकात सामील करून घ्यायचा प्रयत्न केला आहे. पाहा त्यांच्या अद्भुत कामगिरी.’

– उत्तराखंड पोलिस

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये कुत्र्यांच्या ट्रेनिंगसाठी काही अडथळे रचलेले आहेत. जे या कुत्र्यांना पार पाडायचे आहेत. तर स्निफर डॉग्ज सारखंच या भटक्या कुत्र्यांनी अगदी सहजरित्या हे अडथळे पार केल्याचं दिसत आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह मार्च करताना देखील आपण या कुत्र्यांना पाहू शकतो. या संपूर्ण व्हिडिओमध्ये पोलिस पथक कुत्र्यांना चिअर करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

तर नेटिझन्सला उत्तराखंड पोलीसांचा हा उपक्रम फारच आवडलाय. नेटीझन्सनी पोलिसांचे कौतुक देखील केलं.

उत्तराखंड पोलीसांच्या पोस्ट खाली कमेंट करून नेटिझन्स त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या:

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -