Coronavirus: कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स जूनपर्यंत चालणार…!

लॉकडाऊन आणि सरकारी वाहतूक कार्यालये बंद पडल्यामुळे विविध मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत.

New Delhi
driving licens renewal
कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स जूनपर्यंत चालणार...!

देशभरात लॉकडाऊन आणि सरकारी वाहतूक कार्यालये बंद पडल्यामुळे विविध मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेचे नूतनीकरण होत नाही आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून कालबाह्य झालेले ड्रायव्हींग लायसन्स किंवा जूनअखेर संपले असेल तर वैध मानले जाईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहिर केले आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता, वाहन नोंदणी जूनपर्यंत करता येणार आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व परवानग्या, वाहन परवाने आणि नोंदणी फेब्रुवारीपासून कालबाह्य झालेली किंवा इतर कागदपत्रांची वैधता ३० जूनपर्यंत मान्य असेल. मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.


हेही वाचा – अरे बापरे…! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण


देशभरात लॉकडाऊन आणि सरकारी वाहतूक कार्यालये बंद पडल्यामुळे विविध मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असलेल्या लोकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा मोटार वाहन नियमांतर्गत संबंधित इतर कागदपत्रांचा समावेश आहे.