घरदेश-विदेशआता १०० रूपयांच्या नोटांचे आयुष्य वाढणार!

आता १०० रूपयांच्या नोटांचे आयुष्य वाढणार!

Subscribe

नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विशेष प्रयोग

दैनंदिन जीवनातील व्यवहार करताना आलेल्या नव्या चलनातील नोटांचा रंग जांभळ्या, पिवळ्या, हिरव्या असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या रंगामुळे अनेक चर्चा देखील सुरू होत्या. परंतु, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या एका निर्णयामुळे १०० रूपयांची पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतात. कारण देखील तसंच आहे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या १०० रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे. सुरूवातीला या नोटा प्रायोगिक तत्वावर या वार्निशचा कोट असणाऱ्या १०० रूपयांच्या नोटांना कोटिंग केले जाणार आहे.

- Advertisement -

दैनंदिन जीवनात पैशांचा वापर विशेषतः कागदी नोटांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नोटा लवकर फाटतात किंवा ते लवकर खराब होतात. त्यामुळे नोटांचे आयुष्य वाढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशाप्रकारचा प्रयोग करत आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या हातात नव्या वॉर्निशच्या १०० रूपयांच्या नोटा येण्याची शक्यता आहे.

नव्या वॉर्निशच्या १०० रूपयांच्या नोटांचे वैशिष्ट्ये

या वॉर्निशच्या नव्या नोटांचे वैशिष्ट्ये म्हणजे या नोटा लवकर खराब होणार नाही. तसेच त्या लवकर फाटणार देखील नाही, यामुळे या नव्या वॉर्निशच्या १०० रूपयांच्या नोटा अधिक काळ टिकून त्यांचे आयुष्य अधिक काळ टिकून आयुर्मान वाढणार आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या वॉर्निशच्या नोटाचा प्रयोग १०० रूपयांच्या नोटांपासून करणार असून रिझर्व्ह बँकेने या वॉर्निशची १०० रूपयांची नोट लवकरच जारी करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -