घरताज्या घडामोडीकरोनाग्रस्त गायिकेच्या संपर्कातील राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार 'क्वारंटाईन'

करोनाग्रस्त गायिकेच्या संपर्कातील राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार ‘क्वारंटाईन’

Subscribe

कनिका कपूरच्या या पार्टीमध्ये चारशेहून अधिक लोक उपस्थित होते. त्यामुळे आरोग्य विभागाला आता पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांचाही शोध घ्यावा लागणार आहे

‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. सध्या तिला लखनऊमधील रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण आता कनिका कपूरबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मीडियाच्या माहितीनुसार, कनिका कपूरला करोनाची लक्षणे असून सुद्धा तिने एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी करत होती. या पार्टीत सुमारे चारशेहून जास्त लोक उपस्थित होते. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजपचे खासदार दुष्यंत सिंहसुद्ध उपस्थित होते. रविवारी ही पार्टी झाली आणि त्यानंतर ते लंडनहून भारतात परतले. त्यामुळे करोनाग्रस्त असलेल्या कनिक कपूरच्या संपर्कात आल्यामुळे या मायलेकांनाही आता क्वारंटाईन व्हावे लागत आहे. यासंदर्भात वसुंधरा राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची करोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यानंतर तिला लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतील हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती कनिका कपूरने इन्टाग्रामवर दिली. नुकतीच ती लंडनहून परतली होती. मात्र तिने करोनाची लागण झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. इतकचं नव्हे तर तिने करोनाची लागण होऊ सुद्धा एका हॉटेलमध्ये तिने डिनर पार्टी ठेवली असल्याच मीडियाच्या माध्यमातून समोर आलं. कनिकाला करोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर वसुंधरा राजे आणि दुष्यंत यांना घरीच क्वांरटाईन केलं असल्याची माहिती समोर आली. या पार्टीत चारशेहून अधिक असणाऱ्या लोकांचा शोध आरोग्य विभागाला आता घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

भीतीदायक गोष्ट म्हणजे खासदार दुष्यंत सिंह हे पार्टी झाल्यानंतर अनेक वेळा लोकसभेतही उपस्थित राहिले होते. तसंच ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दुष्यंत सिंह सहभागी झाले होते. त्यामुळे आता हे मायलेक कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत त्यांचा देखील आता शोध घ्यावा लागणार आहे.


हेही वाचा – Video: ढिंच्याक पूजा म्हणते, ‘होगा ना करोना’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -