घरदेश-विदेशशत्रूचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायूदल सज्ज

शत्रूचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायूदल सज्ज

Subscribe

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आता बस झाले हल्ले उत्तर द्या, बदला घ्या अशी मागणी होत असतानाच शत्रूचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायु दल सज्ज झाल्याची ग्वाही वायूदलाने दिली आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला ४८ तास उलटल्यानंतर आता भारतीय वायूदल शत्रूचा खात्मा करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही वायूदलाने दिली आहे. भारतीय वायूदलाने राजस्थानातील पोखरणमध्ये शक्तीप्रदर्शन केले आहे. जैसरमेल भागात असलेल्या पोखरण या ठिकाणी ‘वायुशक्ती २०१९’ चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारतीय वायूदलाच्या १३० पेक्षा जास्त फायटर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स यांचा समावेश होता.

पहा :

- Advertisement -

सुखोई आणि जॅग्वार या विमानांचे शक्तीप्रदर्शन

या वायूदलाच्या शक्तीप्रदर्शनात सुखोई आणि जॅग्वार या विमानांनी त्यांची ताकद दाखवण्यात आली. सुखोई ३०, मिग २९, मिराज २०००, जॅग्वार, मिग २७ यांच्यासारख्या फ्रंटलाइन एअरक्राफ्टचा समावेश होता. तसेच तेजस आणि अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर रुद्र यांनीही त्यांची कौशल्यं दाखवली. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरचीही उपस्थिती होती.

- Advertisement -

या प्रदर्शनात स्वेदेशी बनावटीच्या आकाश या विमानानेही त्याची मारक क्षमता काय आहे याचं दर्शन घडवलं. पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर हे प्रदर्शन करण्यात आले ज्याची चर्चा आता प्रत्युत्तराशी जोडली जात आहे. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आता बस झाले हल्ले उत्तर द्या, बदला घ्या अशी मागणी होत आहे. काऊंटर अॅक्शनची मागणी पाहता आज वायूदलाते शक्तीप्रदर्शनही महत्त्वाचे मानले जात आहे. आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना हवाई हल्लाही केला जाणार का हे पाहणे महत्ताचे ठरणार आहे.


हेही वाचा – पुलवामा हल्ल्याचे पडसाद; अजमेर दर्ग्यावर पाक यात्रेकरूंना ‘नो एंट्री’!

हेही वाचा – पुलवामा हल्ल्यानंतर आदिलच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -