जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन

काल रात्री साडे बारा वाजता दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

New Delhi
kuldeep_nayar-
जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर

जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल उशीरा रात्री दिल्ली येथे निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनीशेवटचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १९९७ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून होते कार्यरत. आज दुपारी एक वाजत्या लोधी रोडजवळ असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोण होते कुलदीप नय्यर?

कुलदीप नय्यर जेष्ठ पत्रकार आहेत याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. भारत सरकारच्या वतीने प्रेस आणि माहिती अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. यू.एन.आय, पी.आय.बी, “द स्टेट्समॅन”,”इंडियन एक्सप्रेस” या माध्यमांमध्ये त्यांनी काम केले. याच बरोबर लंडनच्या ‘द टाइम्स’ मध्ये त्यांनी २५ वर्षे प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी पत्रकार आणि लेखक नय्यर यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते देण्यात आला. ऑगस्ट १९९७ मध्ये राज्य सभेत खासदार म्हणूनही त्यांनी काम केले.

सुरुवातीच्या काळात त्यांनी उर्दू भाषेत पत्रकारिता केली. राष्ट्रीय आणी बाणी दरम्यान त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. १९९६ मध्ये नय्यर हे संयुक्तराष्ट्रात भारताच्या प्रातिनिधीक मंडळामध्ये सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here