VIDEO- कुटुंबियांपासून दूर; कोरोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या डॉक्टरलाच झाले अश्रू अनावर

जर आम्हाला काही झाले तर आमचे कुटुंबीय आम्हाला भेटायला येणार नाहीत आणि जर त्यांना काही झाले तर आम्ही जाऊ शकणार नाही...

Delhi
कोरोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या डॉक्टराला झाले अश्रू अनावर

देशात कोरोना व्हायरसचे थैमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत साधारण ४ हजार २८१ लोकं बाधित झाले आहेत. तर कित्येकांचा या कोरोनाने बळी देखील घेतला आहे. असे असताना देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी न डगमगता आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. या अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवस रात्र मेहनत करत आहे. हे डॉक्टर्स आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी झटत असून देशाची सेवा करण्यास सज्ज आहेत.

दिल्लीमध्ये असणाऱ्या एम्स रूग्णालयातील डॉक्टर कोरोना विरूद्धच्या लढ्यात आपली लढाई लढत आहेत. या रूग्णालयातील डॉक्टर अंबिका आपल्या कुटुंबियांपासून दूर असून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहे. कोरोना व्हायरस हे एकप्रकारचे युद्ध असून त्यात आपल्याला जिंकायचे आहे, असे तिने सांगितले.

…आणि अश्रू झाले अनावर

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, डॉ. अंबिकाने सांगितले की,’कोविड १९ विरोधातील हे एक युद्ध आहे. ‘कधीकधी मला भीती वाटते की मी आणि माझे कुटुंब कदाचित या संसर्गाला बळी पडू नये. जर आम्हाला काही झाले तर आमचे कुटुंबीय आम्हाला भेटायला येणार नाहीत आणि जर त्यांना काही झाले तर आम्ही जाऊ शकणार नाही. ‘

आपल्या कुंटुबाबद्दल बोलताना डॉ. अंबिकाला अश्रू अनावर झाले. हे सांगत असताना डॉ. अंबिकाने असे ही सांगितले की, ‘मी बर्‍याच दिवसांपासून आपल्या कुटूंबाला भेटले नाही. ‘माझे कुटुंब खूप सामर्थ्यवान आहे. त्याने असे कधीही म्हटले नाही की सर्व काही सोडून दे आणि आपल्या आपल्या घरी ये.


CoronaVirus: कोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे ४० हजार बेड सज्ज!