विशाखापट्टणममध्ये जहाजाला लागली भीषण आग; २९ खलाशांच्या समुद्रात उड्या

विशाखापट्टणमध्ये समुद्रात जहाजांना पाणी पुरवणाऱ्या जहाजाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

visakhapatnam
जहाजाला भीषण आग

विशाखापट्टणमध्ये समुद्रात जहाजांना पाणी पुरवणाऱ्या जहाजाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जीव वाचवण्यासाठी या पेटत्या जहाजावरील तब्बल २९ खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. या खलाशांपैकी एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या समुद्रात आज, सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरवणाऱ्या जहाजाला आग लागली. यामुळे या जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी २८ जणांना कोस्ट गार्डने वाचवले असून यापैकी एक जण बेपत्ता झाला आहे. जहाजावरील आगीवरही नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.