घरदेश-विदेशVideo: जेव्हा होते २ हत्तींची 'दंगल'

Video: जेव्हा होते २ हत्तींची ‘दंगल’

Subscribe

काही काळ सुरु असलेल्या हत्तींच्या या मारामारीमुळे तेथील वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. हत्ती वाटेतून हटल्यावर येथील वाहतूक पूर्वपदावर आली.

हत्तीचा आकार आणि त्याचा दरारा पाहूनच भल्याभल्यांचा थरकाप उडतो. अवाढव्य आकाराच्या हत्तीची दहशत माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्येच असते. अशातच जेव्हा दोन हत्तींमध्ये आपपसांत जुंपते तेव्हा तर विचारायलाच नको. अशीच एक घटना नुकतीच तामिळनाडूतील मुदुमलाई व्याघ्र अभयारण्यात घडली असून, सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुदुमलाई व्याघ्र अभयारण्याच्या चेकपोस्ट जवळ दोन हत्ती समोरासमोर आले आणि या दोघांमध्ये अचानक ‘दंगल’ सुरु झाली. ते दोघंही एकमेकांच्या अंगावर जाऊन एकमेकांना जोरदार धडका मारत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये दिसत आहे. अभयारण्यात आलेल्या काही पर्यटकांनी हत्तींची ही झुंज व्हिडिओ कॅमेरात कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समजतंय. काही काळ सुरु असलेल्या हत्तींच्या या मारामारीमुळे तेथील वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. हत्ती वाटेतून हटल्यावर येथील वाहतूक पूर्वपदावर आली.

हे दोन्ही हत्ती सुरुवातीला डोक्याने एकमेकांना ढोसत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही मारामारी ते झाडी आणि गवतात करत असल्याचं दिसत आहे. काही वेळाने मात्र ते दोघंही एकमेकांना ढकलत ढकलत रस्त्यावर येतात. ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, सोबतच घाबरलेल्या काही लोकांचा आवाजही या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकू येत आहे. दोन चिडलेले हत्ती अशाप्रकारे थेट रस्त्यावर आल्यावर लोकांची घाबरगुंडी उडणं साहाजिक आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मिळते आगे.  याआधीही हत्तीच्या वेगवेगळ्या करामतींचे असेच व्हिडिओ समोर आले आहेत. याआधी जंगलातून आलेल्या एका हत्तीने जवळच्या वस्तीतील एका घराबाहेर ठेवलेलं अन्न खाल्ल्याचा तसंच एका माणसाला वाचवण्यासाठी हत्तीच्या पिल्लाने नदीत उडी मारल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -