घरदेश-विदेशकशी असेल विजय माल्ल्याची जेलमधील रूम?

कशी असेल विजय माल्ल्याची जेलमधील रूम?

Subscribe

विजय माल्ल्याच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. सीबीआय आर्थड रोड जेलमधील बराक - १२चा व्हिडीओ लंडनमधील कोर्टात सादर करणार आहे.

विजय माल्ल्याचे भारताकडे हस्तांतरण व्हावं यासाठी आता सीबीआयने तयारी सुरू केली आहे. बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. त्याला भारताकडे हस्तांतरण करा अशी मागणी भारताने इंग्लंडच्या कोर्टामध्ये केली होती. त्यावर विजय माल्लाला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येणार? अशी विचारणा कोर्टाने केली. त्यामुळे विजय माल्ल्याला जेलमधील ज्या खोलीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचा व्हिडीओ लंडनच्या कोर्टात सादर करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. जवळपास ६ ते ७ मिनिटाचा हा व्हिडीओ असणार आहे. यामध्ये बराक – १२बद्दल सर्व माहिती असणार आहे. अंघोळीची जागा, टीव्ही सेट, सुर्यप्रकाश आणि ताजी हवा याबद्दल सर्व माहिती देण्यात येणार आहे. कारण, भारतातील जेलमध्ये सुर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळत नाही अशी तक्रार विजय माल्ल्यानं केली होती. त्याबद्दल आता व्हिडीओतून माहिती देण्याचा निर्णय सीबीआयनं घेतला आहे. परिणामी, आता आर्थर रोडमधील बराक – १२ बद्दलची सर्व माहिती व्हिडीओमध्ये असणार आहे.

वाचा – ‘काही मतांसाठी फाशीवर लटकवायचं आहे’ – विजय माल्ल्या

कशी असेल जेलमधील खोली

विजय माल्ल्याला ज्या खोलीमध्ये ठेवण्यात येणार त्याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. ही रूम मेडिकल दृष्ट्या परिपूर्ण असेल. त्यामध्ये सुर्यप्रकाश सहजपणे उपलब्ध असेल. शिवाय, परस्पर विरूद्ध भिंतीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था असेल. सुरक्षेची देखील योग्य ती काळजी घेतलेली असेल. असे यावेळी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -
वाचा – केंद्रीय मंत्री म्हणतात, ‘विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका’!

बँकांना चुना लावून माल्ल्या फरार

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून विजय माल्ल्या परदेशात पसार झाला. त्यानंतर त्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय भारतानं घेतला. शिवाय, विजय माल्ल्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वाचा – विजय माल्ल्याच्या अलिशान विमानाचा पुन्हा लिलाव
वाचा – गोविंदा साकारणार मद्यसम्राट विजय मल्ल्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -