कुणी घर देता का घर? विजय माल्ल्या रस्त्यावर

विजय माल्ल्यावर आता लंडनमध्ये देखीलव बेघर होण्याची वेळ येणार आहे. कारण त्याचं लंडनमधील घर देखील जप्त होणार नाही.

London
Vijay mallya
विजय मल्ल्या

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय माल्ल्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. लंडनमधील अलिशान घर वाचवण्यासाठी विजय माल्ल्याची स्विस बँकेविरोधात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. बुधवारी यूके उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी स्विस बँकेविरोधात विजय माल्ल्याच्या वतीनं करण्यात आलेला युक्तीवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. भारतीय बँकांना चुना लावल्यानंतर विजय माल्ल्याच्या रोझ कॅपिटल वेंचर्स कंपनीने लंडनमधील अलिशान घर गहाण ठेवून स्विस बँकेकडून २०.०४ मिलियन पौंडचे कर्ज घेतले होते. पण ठगसेन विजय माल्ल्याला हे कर्ज फेडण्यास देखील अपयश आलं. परिणामी यूबीएस बँकेला या निवासस्थानावर जप्ती आणायची आहे. २०१९च्या मे महिन्यापासून या खटल्याची सुानवणी होणार आहे. भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावल्यानंतर परदेशातील बँकांना देखील चुना लावण्याचा विजय मालल्याचा मानस आता उधळला गेला आहे. त्यामुळे यूबीएस बँकेचे कर्ज न फेडल्यास विजय माल्ल्याला लंडनमधील अलिशान घर देखील सोडावं लागणार आहे. बुधवारी युके उच्च न्यायालयाने विजय माल्ल्याचा युक्तीवाद फेटाळून लावला आहे. त्यामुळे कुणी घर देता का घर? असं म्हणत फिरण्याची वेळ विजय माल्ल्यावर वेळ येणार आहे. बँकेनं मात्र सध्या हे सारं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. फरार विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये राहत आहे. तो सध्या जामिनावर आहे. भारताकडे सोपवण्यासंदर्भात सध्या लंडनमधील न्यायालयामध्ये खटला देखील सुरू आहे. भारताकडून विजय माल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत.

वाचा – विजय माल्ल्याची SUV विकत घेण्याच्या नादात ४५ लाखांचा गंडा

वाचा – कशी असेल विजय माल्ल्याची जेलमधील रूम?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here