घरदेश-विदेश'अरुण जेटलींच्या निधनाने एक उत्कृष्ट संसदपटू हरपला!'

‘अरुण जेटलींच्या निधनाने एक उत्कृष्ट संसदपटू हरपला!’

Subscribe

जेटली राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते तसेच ते निष्णात विधिज्ञ होते

माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. जेटली राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते तसेच ते निष्णात विधिज्ञ होते. संसदेतील त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू हरपला आहे, अशी भावना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – ‘अरुण जेटली यांच्या निधनामुळे अभ्यासू नेते काळाच्या पडद्याआड’


जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, जेटली यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी दशेपासूनच सुरु झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. जेटली भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्षही होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. तर मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

- Advertisement -

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही जेटलींनी भूषवले. विद्यार्थी नेते ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ उच्च न्यायालयात वकिली केली. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अरुण जेटली मागील काही महिन्यांपासून आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत वडेट्टीवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -