माउंट एव्हरेस्टवीर मनीषाचे गावात जंगी स्वागत

जगातील सर्वात मोठे टोक माउंट एव्हरेस्ट गाठून देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या गिर्यारोहक मनीषा पायलचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.

Mumbai
vellagers welcomed Manisha Payal
मनीषा पायलचे गावी जंगी स्वागत

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केलेली गिर्यारोहक मनीषा पायलने आज आपल्या गावी भेट दिली. यावेळी गावाच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी मनीषाचे जंगी स्वागत केले.

गावचे सरपंच राममूर्ति फौगटच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पूष्पवृष्टी करत मनीषा पायलचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी मनीषा पायलच्या या प्रवासात तिची मदत केलेल्या सर्वांनाही सन्मानित केले. यावेळी मनीषा पूर्ण जिल्ह्याची गौरवशाली बेटी असल्याचे कौतुकोद्गार, भाजप नेता वेद फुला यांनी काढले.

महिला सबलीकरणासाठी पंतप्रधानांच्या प्रयत्नांनी मनीषाला मिळाली प्रेरणा

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सर करणे हे जवळपास प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. त्याप्रमाणेच स्वप्न बाळगलेली मनीषा पायलने अथक प्रयत्नानंतर काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट सर केला. माउंट एव्हरेस्टवर पोहोचताच मनीषाने भारताचा राष्ट्रध्वज आणि पंतप्रधान मोदींचे छायाचित्र असलेला ध्वज अभिमानाने फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सबलीकरणासाठीच्या प्रयत्नांचा मनीषा पायलवर पगडा आहे.