घरदेश-विदेशपश्चिम बंगालमध्ये नियमांचे उल्लंघन, आमदारांनीच घेतली लस

पश्चिम बंगालमध्ये नियमांचे उल्लंघन, आमदारांनीच घेतली लस

Subscribe

आमदारांनीच लस घेतल्याने राजकीय वातावरण तापलं

जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. जगभरात करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे. भारतात शनिवार १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु केली आहे. या कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत सुरुवातीला देशातील आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांन लस देण्याचे ठरवण्यात आले आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनी कोरोना लस घेतल्याचे समजते आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोना लसीकरणाचे नियम या नेत्यांनी मोडल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे.

कोरोना लसीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करत तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी लस घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली असल्याचे समजते आहे. पश्चिम बंगालमध कटवा मतदार संघातील आमदार रबी चॅटर्जी यांनीही कोरोना लस टोचून घेतली आहे. तर पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने कोरोना लस घेतली आहे. केंद्र सरकारने काढलेल्या नियमावलीत कोरोना लसीकरणच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना लस देण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

पश्चिम बांगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोना लस देण्याचे ठरविण्यात आले आहे. परंतु आम्ही काही आमदारांसह इतर लोकांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे पाहिले आहे. या नेत्यांची पहिल्या टप्प्यातील यादीत नाव नव्हते. तसेच त्यांना पहिल्या टप्प्यात लस घेण्याची कोणतीही गरज नव्हती. कोरोना लस घेतलेल्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवावी लागते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही यादी सार्वजनिक करायला हवी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -