घरदेश-विदेशराजस्थानमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार

राजस्थानमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार

Subscribe

राजस्थानमध्ये विधानसभेच्या मतदानादरम्यान हिंसाचाराची घटना घडली आहे. यादरम्यान हाणामारी आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या मतदानादरम्यान हिंसाचार भडकल्याचे दिसून येत आहे. या हिंसाचारात हाणामारी आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. राजस्थानच्या सीकर फतेहपूरमध्ये मतदानदरम्यान दोन गटांत वाद झाला. यादरम्यान जमावाने काही गाड्यांची जाळपोळ करुन हाणामारी करत हिंसाचार केला. घटनेची माहितीमिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अर्ध्या तासाने मतदान पूरवर्त झाले आहे.

- Advertisement -

असा घडला हिंसाचार

भरतपूर विधानसभा क्षेत्रात एका मतदाराला मारहाण करण्यात आली. ही मतदाराला केलेली मारहाण उमेदवाराच्या समर्थकाने केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. समर्थकाने आपल्या उमेदवारालाच मतदान करावे या कारणाने त्याला मारहाण करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी चाकूने हल्ला केला त्या हल्ल्यात तीन लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अहोर येथील बूथ क्रमांक २५३ आणि २५४ बूथवर मतदारांमध्ये धक्काबुक्कीच्या घटना देखील घडल्या. यावेळी भरतपूर विधानभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार अनीता सिंह यांच्या सुरक्षारक्षकाला देखील मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडील बंदूक देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

वाचा – ५ राज्यांमध्ये काँग्रेस आणणार भाजपच्या ‘नाकी दम’?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -