घरदेश-विदेशvideo: कपड्यावरून बोलणाऱ्याला 'ती' ने शिकवला चांगलाच धडा!

video: कपड्यावरून बोलणाऱ्याला ‘ती’ ने शिकवला चांगलाच धडा!

Subscribe

हल्ली कोणीही उठून लोकांना शिकवायला लागलय. आपल्या संस्कृतीचे डोस देण्यात लोकांना आता धन्यता वाटायला लागली आहे. अशाच एका संस्कृतीचे धडे देणाऱ्या एका माणसाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये हा माणूस एका तरूणीला भारतीय संस्कृतीचे डोस देत आहे. भारतीय संस्कृती, संस्कार आणि नैतिकतेचे धडे तो एका तरूणीला देतोय. शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान केलेली एक तरुणी आपल्या मित्रासोबत बाईकवरून प्रवास करत होती. त्यावेळेस या दोघांच्या शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. काय तर म्हणे भारतीय महिलांनी अशाप्रकारचे कपडे परिधान करता कामा नये.

- Advertisement -

व्हायरल झालेला हा व्हीडीओ बंगळुरमधला असल्याचे म्हटले जाते. गुरूवारी रात्री एएसआर लेआऊट परिसरात ही घटना घडली. या व्हीडीओमध्ये आपल्याला दिसतय की एक अनोलखी तरूण शॉटर्स पॅण्ट घातलेल्या तरूणीला कपड्यांवरून बोलत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी असे शॉटर्स कपडे घालू नयेत. भारतीय संस्कृतीचे पालन केले पाहिजे. असे उपदेशाचे डोस देत आहे. हा व्हीडीओ तरूणीच्या मित्राने शूट केला आहे. आणि सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

यावेळी तरूणाईच्यासोबत असणाऱ्या तरूणाने आणि या तरूणीने त्या माणसाला चांगलेच सुनावले. या वेळी त्यांनी व्हीडीओ काढत असल्याचे समजताच त्या माणसाचा आवाज कमी झाला आणि त्याने तिथून पळ काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -