घरट्रेंडिंगVideo :हा काय प्रकार आहे? तमिळनाडूत ड्रायव्हरशिवाय चालत होती कार! व्हिडिओ तुफान...

Video :हा काय प्रकार आहे? तमिळनाडूत ड्रायव्हरशिवाय चालत होती कार! व्हिडिओ तुफान व्हायरल!

Subscribe

ड्रायव्हरशिवाय अजून तरी कोणतीही कार चालत असलेली कुणी पाहिलेली नाही. किमान भारतीय रस्त्यांवर तरी अशी कार अद्याप उतरलेली नाही. पण तमिळनाडूमध्ये व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये चक्क एक कार ड्रायव्हरशिवायच चालताना दिसत आहे. त्यामुळे बघणारे देखील बुचकळ्यात पडले असून हा नक्की काय प्रकार आहे? असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर ही कार धावताना हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे जागीच चुकून गिअर पडल्यामुळे थोड्या अंतरावर कार गेली असेल या शंकेला देखील जागा राहात नाही. एका माणसाने हा व्हिडिओ शूट केला असून तो त्यानं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सला मात्र काही कळेना झालं आहे. नक्की हे शक्य कसं झालं? याचा शोध घेण्यात आता नेटिझन्स गुंतले आहेत!

नक्की झालं तरी काय?

टागोर चेरी नावाच्या एका व्यक्तीनं गेल्या आठवड्यात हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक जुनी फियाट कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. नंबर प्लेटवरून ही कार तमिळनाडूची असल्याचं स्पष्ट होतंय. शिवाय, भाषेवरून हा व्हिडिओ देखील तमिळनाडूमध्येच शूट केला असावा असा अंदाज आहे. तर या व्हिडिओमध्ये दिसणारी ही कार रस्त्यावरून बऱ्यापैकी वेगात जात आहे. कारमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला एक वयस्कर व्यक्ती बसल्याचं दिसत आहे. पण ड्रायव्हिंग सीटवर मात्र कुणीही बसलेलं नाही.

- Advertisement -

मागच्या बाजूने जाणाऱ्या एका दुसऱ्या गाडीतून…

हा व्हिडिओ शूट झालेला आहे. एखादी बुटकी व्यक्ती गाडी चालवत असावी, त्यामुळे ती मागच्या बाजूने दिसत नसावी असा अंदाज येऊन मागच्या गाडी चालकानं गाडी पुढे घेतली. मात्र, बाजूने पाहिल्यानंतर देखील ड्रायव्हिंग सीटवर कुणीही बसल्याचं दिसत नसल्यामुळे सगळेच चक्रावले आहेत. त्यामुळे हा नक्की काय प्रकार असावा, याचा शोध घेत या पोस्टवर शेकडो कमेंट पडू लागल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने कारणाची थिअरी मांडू लागला आहे.

Today saw something a old man driving his padmini car sitting in passenger seat WTF 😂How is this possibleTo use this video in a commercial player or in broadcasts, please email licensing@storyful.com”

Posted by Tagore Cherry on Thursday, October 8, 2020

- Advertisement -

रतन सिंह भाटी नावाच्या एका व्यक्तीने…

दावा केला आहे की ही कार या व्यक्तीने विशिष्ट प्रकारे मॉडिफाईड करून घेतली आहे. एक्सलरेटर, क्लच आणि ब्रेक त्यानं डाव्या बाजूला बसवून घेतले आहेत. त्यामुळे डाव्या बाजूला बसून देखील तो कार चालवू शकतो. मात्र, या थिअरीची सत्यता अद्याप पडताळली गेली नसल्यामुळे ही कार आणि कारमध्ये बसलेली व्यक्ती नेटिझन्ससाठी एक गूढ बनून राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -