व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे; प्राध्यापकाची वादग्रस्त पोस्ट

व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात. तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का? अशी वादग्रस्त पोस्ट एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने फेसबुकवर केली आहे. याप्रकरणावरुन गदारोळ झाला आहे.

Kolkata
‘Virgin girl is like sealed bottle,’ Jadavpur University professor posts on Facebook, deletes it
कनक सरकार, जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक

व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात अशी वादग्रस्त पोस्ट एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने फेसबुकवर केली आहे. तसेच या प्राध्यापकाने महिलांच्या कौमार्यासंदर्भात देखील आक्षेपार्ह असे लिहिले आहे. त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कनक सरकार असे या प्राध्यापकाचे नाव असून हा कोलकतामधील जाधवपूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

अशी केली फेसबुक पोस्ट

कनक सरकार या प्राध्यापकाने लिहिलं आहे की, तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का? पुढे त्यांनी लिहिलं आहे की, अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा नसतो. यावरचं ते थांबले नाही तर ते पुढे , असे देखील म्हणाले आहे की, ‘मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते जोपर्यंत ते उघडलं जात नाही, कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्ये तसेच लैगिंक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. तसेच मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परिप्रमाणे असते.’

पोस्ट केली डिलीट

जाधवपूर विद्यापीठाच्या साक्षात प्राध्यापकांच्याच अत्यंत आक्षेपार्ह आणि हिणकस अशा या पोस्टमुळे प्रचंड गदारोळ झाला. गदालोळ होऊ लागल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. तसेच आपण काहीच चुकीचं बोलेलो नाही. राज्यघटनेने मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिल आहे, असे कनक सरकार यांनी म्हटलं आहे.

महिलांच्या अधिकाराबद्दल बोलतो

आपण नेहमीच महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत असल्याचं कनक सरकार यांचे म्हणणे आहे. हे आपले वैयक्तिक मत होत असेही तो पुढे म्हणाला आहे. तसेच मी कोणत्याही व्यक्तीविरोधात तसेच कोणत्याही पुराव्याशिवाय काही म्हटलेल नाही. त्याचप्रमाणे मी समाजाच्या चांगल्यासाठीच लिखाण करत आहे. माझ्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर होत आहे. कृपया लोकांची दिशाभूल केली जाऊ नये. तसेच यापूर्वी मी अनेकदा महिलांसाठी आणि त्यांची बाजू मांडणाऱ्या अनेक पोस्ट केल्या असून तुम्ही त्या पाहू शकता असा बचावही कनक यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here