Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश व्हर्च्युअल लग्न पडलं महाग, पैसे आणि दागिन्यांसह नवरदेव फरार

व्हर्च्युअल लग्न पडलं महाग, पैसे आणि दागिन्यांसह नवरदेव फरार

फतेहपुर पोलीस स्थानक गाठत पतीविरोधात केली तक्रार दाखल

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे सारं जग जणू ऑनलाईन झाले आहे. कोरोनामुळे सण, उत्सव, पार्टीला जाता न आल्याने अनेक जण पार्टी, सणांची मज्जा ऑनलाईन घेताना आपण पाहतो. त्यामुळे ऑनलाइन व्हिडियो, Whatsp कॉलिंग आपल्या जगण्याचा भाग बनत आहे. यात आता ‘ऑनलाइन लग्न’ किंवा ‘व्हर्च्युअल लग्न’ ही संकल्पना सुद्धा नव्याने सुरु होत आहे. परंतु व्हर्च्युअल लग्न करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कारण फेसबुकवर व्हर्च्युअल लग्न केलेल्या नवऱ्याने पत्नीचे पैसे, दागिने घेऊन धुम ठोकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फतेहपुरमधील एका युवकाने फेसबुकवर कोलकत्तामधील एका युवतीसोबत लग्न केले. त्यानंतर तो काही दिवसांसाठी पत्नीच्या घरी राहायला आला. यादरम्यान पती पत्नीच्या घरातील दागिने, पैसे घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी पत्नीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात पत्नीचे म्हणणे आहे की, फेसबुकद्वारे फतेहपुरमधील अभिषेक आर्यासोबत माझी मैत्री झाली. यावेळी फेसबुकवर बोलत असताना आमच्यात दुरचे नातेवाईक एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे समजले. यावेळी सतत एकमेकांशी बोलत असताना अभिषेकने लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकला. दरम्यान अभिषेकने व्हिडिओ कॉलवरुन गळ्यावर ब्लेड ठेवत ‘तू मला भेटली नाहीस तर गळा कापून घेत आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली. यावर पत्नीने लक्ष दिले नाही परंतु अभिषेकने दिल्लीवरुन विमान पकडतं कोलकत्ता गाठले. कोलकत्ता पोहचल्यानंतर अभिषेकने माझी समजूत घातल मला लग्नासाठी तयार केले. त्यानंतर आम्ही दोघांनी ‘कोर्ट मॅरेज’ करत एका हॉटेलमध्ये काही वेळ थांबलो. आणि थोड्यावेळाने माझ्या घरी गेलो. याचदरम्यान पती अभिषेक माझ्या घरातील तीन लाखांचे दागिण्यांसह एक लाखांची रोकड घेऊन पसार झाला. अभिषेकचे वडील राजू आर्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करता आणि याप्रकरणातनंतर ते सुद्धा घरातून गायब आहेत. यानंतर अडचणीत सापडलेल्या पत्नीने एक वर्षानंतर धोकेबाज पतीचे फतेहपुर येथील घरी जात जाब केला त्यानंतर फतेहपुर पोलीस स्टेशन गाठत पतीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाची फतेहपुर पोलीस कसून चौकशी करत असून आरोपी पतीचा शोध घेत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -