घरट्रेंडिंगअमेरिकेचा पाकिस्तानला झटका; केली कोंडी

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका; केली कोंडी

Subscribe

पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या विसाचा कालावधी ५ वर्षांवरुन कमी करुन थेट ३ महिन्यांवर आणला आहे.

दहशतवाद्याला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला नुकताच एक नवा झटका देण्यात आला आहे. पाकिस्तानी नागिरकांना देण्यात येणाऱ्या विसाचा कालावधी अमेरिकेच्या सरकारने कमी केला आहे. अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या विसाचा कालावधी ५ वर्षांवरुन कमी करुन थेट ३ महिन्यांवर आणला आहे. अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीच्या आधारे एअरवाई न्यूजने याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाला खत-पाणी घातल्याच्या आरोप संपूर्ण जगातून त्यांच्यावर केला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन सर्वांच्याच टीकास्थानी आलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने हा मोठा झटका दिला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

- Advertisement -

आतंकवादाला पाठीशी घालणारा पाकिस्तान आता याच मुद्द्यावरुन जागतिक पातळीवर एकटा पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच तेथील नागरिकांना मिळणाऱ्या विसाचा कालावधी कमी करुन पाकिस्तानने त्यांना चांगलाच धडा शिकवला
आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे जे पाकिस्तानी नागरिक अमेरिकेत येऊ इच्छितात त्यांना केवळ ३ महिन्यांचाच विसा मंजूर केला जाईल. याआधी अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या विसाचा कालावधी ५ वर्ष इतका होता. ट्रम्प सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं अमेरिकन नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे.

याआधी वेळोवेळी अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर टीका केली आहे. ‘पाकिस्तानने दहशतवादाला जिवंत ठेवलं आहे’ अशी परखड टीका करत, अमेरिकेने जागतिक पातळीवर अनेकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यावरुनही अमेरिकेने भारताची साथ देत अमेरिकेवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यानंतर त्याचा बदला म्हणून भारताने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या ‘एअर स्ट्राईक’चंही अमेरिकेने समर्थन केलं होतं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -