घरदेश-विदेशपुलवामामधील चकमकीत एक जवान शहीद

पुलवामामधील चकमकीत एक जवान शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरु असतानाच काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शहीद जवानांमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजीत आणि १० अर्धसैनिक दलाचे सनीद यांचा समावेश असून या चकमकीत एक जवान जखमी झाले आहेत.

- Advertisement -

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षादलाने जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध मोहित हाती घेतली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील रत्नीपोरामध्ये मंगळवारी सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. नवे वर्ष सुरु झाल्यानंतर सुरक्षादलाने आपली मोहीम अधिक सक्रिय केली आहे. तरी देखील दहशतवादी कारवाया सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे.

इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरु असलेल्या चकमकीत लष्कराने संपूर्ण भागाला घेरले आहे. तसेच या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तसेच अन्य दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु ठेवण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पाच दहशतवादी ठार

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुगम जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानाने परिसरात शोधमोहीम सुरु केली. त्यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या दरम्यान लष्कराच्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडमधील चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी चकमक सुरु झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्डसच्या जवानांनी ही कामगिरी बजावली होती.


वाचा – छत्तीसगडमधील चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

वाचा – पुलवामामध्ये चकमक; जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -