शोपियानमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

Jammu & Kashmir
Jawan indian army lost his life ceasefire violation pakistan
पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या जवानाला वीरमरण

जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये आज सकाळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे चकमक झाली. या चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शोपियान परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी शोध मोहीम करण्यास सुरुवात केली. या शोध मोहिमे दरम्यान एका दहशतवाद्याला ठाक करण्यात आले आहे.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असतानाच आज पुन्हा एकदा शोपियान जिल्ह्यातील मोलू चित्रगम परिसरात सोमवारी चकमक सुरु झाली आहे. चित्रगम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसरात घेराव घालून एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. आज सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला जवानांकडून चोख उत्तर देण्यात आले आहे.

चार दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ३१ मे रोजी देखील चकमक झाली होतीया चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना घेरले होते. शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून ऑपरेशन सुरु केले होते. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.