घरक्रीडाChinese कंपनी Vivo अखेर IPLमधून आऊट!

Chinese कंपनी Vivo अखेर IPLमधून आऊट!

Subscribe

गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने केलेल्या आगळिकीनंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. बाजारपेठेत जरी चीनी बनावटीचे मोबाईल हातोहात विकले जात असले, तरी मोठ्या व्यासपीठावर चीनी कंपन्यांना नो एंट्रीचे बोर्ड लागायला सुरुवात झाली आहे. त्यात सर्वात मोठा फटका चीनी मोबाईल कंपनी असलेल्या Vivo ला बसला आहे. दरवर्षी Vivo कडे IPL ची टायटल स्पॉन्सरशिप असते. IPL च्या मुख्य ट्रॉफीवर आणि सर्व फ्रॅन्चायजींना वीवोकडून स्पॉन्सरशीप देखील मिळत होती. मात्र, या वर्षीसाठी हा करार रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात BCCI ने माहिती दिली आहे. यामुळे आयपीएल फ्रॅन्चायजींचं मोठं नुकसान होणार असून बीसीसीआयला देखील याचा फटका बसणार आहे. आता बीसीसीआयला आयपीएलसाठी नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.

- Advertisement -

२०१८मध्ये वीवोने आयपीएल स्पॉन्सरशिपसाठी तब्बल २१९० कोटी रुपयांचा करार केला होता. ५ वर्षांसाठी हा करार चालणार होता. या करारानुसार दरवर्षी Vivo कडून ४४० कोटी रुपये येतात. यातले निम्मे सर्व संघांच्या फ्रॅन्चायजींना दिले जातात. यानुसार प्रत्येक संघाच्या फ्रॅन्चायजीला २७.५ कोटी रुपये मिळत होते. मात्र, आता हा करार रद्द झाल्यामुळे या संघांना आणि IPL गव्हर्निंग कौन्सिलला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. मात्र, इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या रकमेसाठी स्पॉन्सरचा शोध घेणं, त्यासाठी कंत्राटाची प्रक्रिया राबवणं हे बीसीसीआयसाठी आणि आयपीएलसाठीही जिकिरीचं होऊ शकतं. दरम्यान, या वर्षासाठी जरी हे कंत्राट रद्द झालं असलं, तरी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ पासून २०२३ पर्यंतच्या कालावधीसाठी Vivo सोबत नवा करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -