घरदेश-विदेशआता पाच रुपयात नरेंद्र मोदींना भेटा

आता पाच रुपयात नरेंद्र मोदींना भेटा

Subscribe

नरेंद्र मोदी अॅप (नमो अॅप) आलेल्या नवीन फिचर अंतर्गत आता सर्वसामान्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे सोपे जाणार आहे.

देशाचे पंतप्रधांनावर देश चालवण्याची जाबाबदारी असल्याने ते खूप व्यस्त असतात. अगदी दिग्गज व्यक्तिंनाही भेटण्यासाठी त्यांना वेळ नसतो तर सामान्य नागरिकांना भेटण्याची गोष्ट तर दुरच राहिली. मात्र आता पाच ते हजार रुपये भरुन पंतप्रधान मोदींना नागरिक भेटू शकणार आहेत. नरेंद्र मोदी अॅप (नमो अॅप) द्वारे पंतप्रधांना भेटण्याची संधी मिळणार आहे. नमो अॅपमध्ये एक फिचर जोडल्या गेले आहे. या फिचरद्वारे एक रेफरल कोड युजर्सला मिळणार आहे. हा मिळवण्यासाठी युजर्सला ५ ते १००० रुपये भाजपला द्यावे लागणार आहे. हा रेफरल कोड मिळाल्यावर त्याला व्हॉट्सअॅर, एसएमएस किंवा ईमेल द्वारे पाठवावा लागणार आहे. यानंतर युजर्सला पंतप्रधांना भेटता येणार आहे.

- Advertisement -

अशी मिळवा भेटीची संधी

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने इकनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, “युजर्सला पैसे डोनेट केल्यानंतर मिळालेला कोड शेअर करावा लागणार आहे. त्याने केलेल्या कोडवरून शंभर युजर्सला पैसे डोनेट करावे लागतील. यानंतर मुख्ययुजर्सला पंतप्रधांनाना भेटण्याची संधी मिळेल.” नागरिक आणि पतंप्रधांनामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून नमो अॅपची निर्मिती करण्यात आली. या सेवेला सुरुवात झाली असून सरासरी एका व्यक्तीकडून ३०० ते ४०० रुपये डोनेट केले जातात असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -