घरदेश-विदेशसर्वसमावेशक जाहीरनाम्यासाठी भाजपचा संकल्प - पीयूष गोयल

सर्वसमावेशक जाहीरनाम्यासाठी भाजपचा संकल्प – पीयूष गोयल

Subscribe

देशातील सर्व घटकांना सामावून घेऊन त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे. यात ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ ही टॅगलाईन घेण्यात आली आहे. या माध्यमातून सर्व घटकांची मते जाणून घेऊन सर्वसमावेशक जाहीरनामा मांडला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून नव राष्ट्र निर्मितीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या मनात असलेल्या भारत निर्माणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला आहे. या अनुषंगाने भाजपने आणखी एक पल्ला पार केला आहे. या माध्यमातून देशहित, जनहित साधून एक प्रकारे जनतेला अपेक्षित सरकार आणण्याचा विचार भाजपने केला आहे. यासाठी देशभरात ७,५०० बॉक्स वितरित केले जाणार असून ते मंडल स्तरावर जाऊन प्रमुख जागांवर ठेवले जाणार आहेत. अशा प्रकारे ३५० रथही देशभरात फिरणार आहेत. तसेच वेबसाईट, ट्विटर, फेसबूकच्या माध्यमातूनही सर्वसामान्य लोक आपल्या सूचना देऊ शकतात, असेही गोयल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -