दुबळे मोदी चीनला घाबरतात – राहुल गांधी

'चीन जेव्हा केव्हा भारताविरोधात कारवाई करते तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही', असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.

Mumbai
Weak Modi is scared of Xi,Not a word comes out of his mouth when China acts against India - rahul gandhi

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्याला पूर्णत: जबाबदार असलेली पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर, याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चीनने पुन्हा एकाद आडकाठी केली आहे. याप्रकरणी  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. याच मुद्द्यावरुन राहुल यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींना टार्गेट केले आहे. ‘मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात’ असे राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘दुबळे मोदी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा केव्हा भारताविरोधात कारवाई करते तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही’, अशा अर्थाचे ट्वीट राहुल यांनी केले आहे.


चीनकडून चवथ्यांदा नकाराधिकाराचा वापर

मसूद अझहरसाठी नकाराधिकाराचा वापर करण्याची चीनची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे. यापूर्वी चीनने २००९, २०१६, २०१७ या तिनही वर्षी अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला होता. जैशने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताची बाजू घेत २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर आक्षेप घेण्यासाठी दिली गेलेली १० दिवसांची मुदत बुधवारी संपली. त्यानंतरच समिती सदस्यांच्या मताच्या आधारे निर्णय घेतला गेला. मात्र, याहीवेळी  चीनने या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला.या प्रस्तावाला विरोध करताना चीनने पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, १० हून जास्त देशांनी या प्रस्तावामध्ये भारताचीच साथ दिली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here