घरदेश-विदेशदेशभरामध्ये डॉक्टरांचा संप सुरुच; ममता बॅनर्जींना दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

देशभरामध्ये डॉक्टरांचा संप सुरुच; ममता बॅनर्जींना दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

Subscribe

दिल्लीमध्ये आजही एम्स रुग्णालयासह १८ पेक्षा जास्त मोठ्या रुग्णालयातील जवळपास १० हजार डॉक्टर संपावर गेले आहेत.

डॉक्टरांना मारहाणीच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेला संप सुरुच आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम पश्चिम बंगालपासून ते दिल्लीपर्यंत पहायला मिळत आहे. देशामध्ये १९ पेक्षा जास्त राज्यामध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करुन समर्थन केले आहे. दिल्लीमध्ये आजही एम्स रुग्णालयासह १८ पेक्षा जास्त मोठ्या रुग्णालयातील जवळपास १० हजार डॉक्टर संपावर गेले आहेत. दिल्लीच्या एम्स रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अल्टिमेटम दिला आहे. डॉक्टर्स असोसिएशनने सांगितले की, ‘आम्ही पश्चिम बंगाल सरकारला संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने मागण्या पूर्ण केल्यान नाही तर आम्ही एम्स रुग्णालयामध्ये बेमुदत संपावर जाऊ.’

१७ जूनला देशव्यापी संप

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील संपाला पाठिंबा दिला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशन (डीएमए) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने देशातील १९ राज्यातील डॉक्टरांनी एकत्रित येत १७ जून रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या असोसिएशनने सरकारला पत्र लिहून केंद्रीय रुग्णालय सुरक्षा कायदा बनवून संपूर्ण देशामध्ये लागू करण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत त्यांनी मागण्याची एक यादी जारी केली आहे. या मागण्या मान्य केल्या नाही तर देशव्यापी संप करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

एम्स रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या मागण्या

– पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर राजकारणाशी प्रेरित हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा.

– देशभरातील रुग्णालयामध्ये एक सारखी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात यावी. तसंच वार्डमध्ये प्रत्येक प्रवेश देण्यासाठी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर) बनवले जावे.

- Advertisement -

– रुग्णालयामध्ये सुरक्षा गार्डची संख्या वाढवावी. बंदूकधारी सुरक्षा गार्ड तैनात करावे.

– मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवली जावी.

– सर्व रुग्णायामद्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. आपत्कालीन कक्षामध्ये सीसीटीव्ही बसवावे.

– रुग्णालयामध्ये सुरक्षेसाठी हॉटलाइन अलार्म सिस्टम बसवण्यात यावी.

– सुरक्षेची नियमित वेळी तपासणी केली जावी.

डॉक्टरांचे राजीनामा सत्र सुरुच

डॉक्टरांना मारहाण केल्याच्या विरोधात आतापर्यंत १०० डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. एकट्या बंगालमध्ये जवळपास ७०० डॉक्टरांनी नोकरी सोडली आहे. काही राज्यामध्ये काळी फित बांधून तर काही ठिकाणी हेल्मेट घालून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. डॉक्टरांच्या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहेत. अनेक राज्यातील रुग्णालयामध्ये ओपीडी सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

कोलकाताच्या एनारएस रुग्णालयामध्ये सोमवारी एका रुग्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट डॉक्टरांना मारहाण केली. यामध्ये काही डॉक्टर्स गंभीररित्या जखमी झाले. या मारहाणीचा निषेध करत डॉक्टर्स संपावर गेले आहेत. गेल्या ४ दिवसापासून पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -