पश्चिम बंगालमध्ये प्रचार कालावधी २० तासांनी कमी; निवडणूक आयोगाचा निर्णय

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार कालावधी २० तासांनी कमी करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

West Bengal
west bengal lok sabha election campaign will stop 20 hours election commission
दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक मयत, दुबार मतदार

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार कालावधी कमी करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. येत्या १९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १० नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून २० तासांनी प्रचार कमी होणार आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसेच हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

मुख्य सचिवांकडे सोपवण्यात आला पदभार

पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आबहे. मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे बैठक देखील झाली. या बैठकीनंतर निवडणूक प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या जागांवरील प्रचार गुरूवारी रात्री १० वाजता संपणार असल्याची माहिती निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली आहे. तसेच देशात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाकडून कलम ३२४ चा वापर करण्यात आला आहे.