घरदेश-विदेशमोमो गेमविरोधात बंगाल सरकार कारवाईच्या तयारीत

मोमो गेमविरोधात बंगाल सरकार कारवाईच्या तयारीत

Subscribe

ब्लू व्हेल गेमनंतर आता मोमो गेम देशभर व्हायरल होत आहे. मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ अनेक लहानगी तसेच तरुण मुले खेळताना आढळली आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. या धोकादायक मोमो चॅलेंजमुळे आतापर्यंत भारतात दोन मुलांचा जीव गेला आहे. हा गेम कोलकात्यासह पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. पश्चिम बंगालमध्ये या मोमो गेममुळे आतापर्यंत दोन मुलांचा जीव गेला आहे. या मोमोविरोधात पश्चिम बंगाल सरकारने व पश्चिम बंगाल पोलिसांनी कंबर कसली आहे.मोमो चॅलेंजच्या जाळ्यात अनेक विद्यार्थी अडकत असल्याने या धोकादायक खेळाचा सामना करण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.

पश्चिम बंगाल पोलिस प्रशासनातर्फे एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेकांना अनोळखी नंबरवरुन त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मोमो चॅलेंजचे इनव्हिटेशन आले आहे. त्याबाबतच्या तक्रारी समोर आल्यात. त्यामुळे अशा घटनांवर पोलिसांचे लक्ष आहे. आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या कृतीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

तरुणांनी या चॅलेंजसाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दार्जिलिंगच्या कुर्सियांगमध्ये मनिष सर्की (वय १८) आणि आदिती गोयल (वय २६) या दोघांनी मोमो चॅलेंज स्विकारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्यांनंतर बंगाल सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामळे बंगाल सरकारने याविरोधात कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे.

काय आहे MOMO गेम?

उपलब्ध माहितीनुसार, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक नंबर येतो. हा नंबर ‘मोमो’ या नावाने सेव्ह केलेला असतो आणि त्यावर एका विचित्र चेहऱ्याच्या बाईचा फोटो असतो. इतकंच नाही तर त्याखाली ‘कॉन्टॅक्ट मी’ असा मेसेजही लिहीलेला असतो. अनेक लोक उत्सुकतेपोटी हा नंबर सेव्ह करतात आणि तिथूनच या खेळाला सुरुवात होते. आतापर्यंत समोर आलेल्या अहवालानुसार बऱ्याच लोकांनी या मोमोचा नंबर सेव्ह करुन तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञ सांगतात की, या नंबरवरुन तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधता, ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्या मनामध्ये भीती भरवते. आयुष्यातील अडचणी, संकटं यांची भीती दाखवत कॉल करणाऱ्याला घाबरवून टाकते, निराश करते. त्यानंतर एकप्रकारे हिप्नोटाईज करुन कॉलरला आत्महत्येकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -